पेगलवाडी (ना) गावाची माहिती

मौजे पेगलवाडी (ना) हे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात वसलेले एक शांत आणि निसर्गरम्य गाव आहे. हे गाव नाशिकपासून सुमारे 29 किलोमीटर आणि त्र्यंबकेश्वरपासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या सुमारे 1100 असून येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. भात हे या गावाचे प्रमुख पीक आहे.

गावात जिल्हा परिषदेची शाळा इयत्ता 1 ते 8 पर्यंत आहे तसेच दोन अंगणवाडी केंद्रेही कार्यरत आहेत. गावात एक समाजमंदिर आणि एक हनुमान मंदिर असून ते गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे केंद्र आहे.

ग्रामपंचायतीची स्थापना 1 जुलै 1994 रोजी झाली. गावातील एकूण मतदारसंख्या 762 आहे, तर एकूण 9 महिला बचत गट कार्यरत आहेत. गावात तीन सार्वजनिक विहिरी आहेत.

गावाचा पिनकोड 422213 आहे. गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी जवळचे बसस्थानक त्र्यंबकेश्वर येथे आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात या गावातून मोठ्या संख्येने भाविक ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी जातात.